प.बा.:तुम्ही गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला
============ ========= ========= ========= ========= ==
Do u know d meaning of M.P.M.N.?
Mala Pan Mahit Nahi!
============ ========= ========= ========= ========= ==
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?
दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाची चॉकलेटं द्या...
============ ========= ========= ========= ========= ==
भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्तं पाउस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर..
============ ========= ========= ========= ========= ==
प्रियकर प्रेयसीला प्रेमाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग..
मग काय..
.
प्रेयसी झाडू लागली
============ ========= ========= ========= ========= ==
हॉलीवुड चित्रपटाची मराठी नावे
DIE ANOTHER DAY=नंतर कधीतरी मर
SUPERMAN=लई भारी मानुस
SCORPION KING=तात्या विंचू
THE MUMMY =आई
THE MUMMY RETURNS=आई परत आली..
============ ========= ========= ========= ========= ==
बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत...
============ ========= ========= ========= ========= ==
एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा बिझनेस काय म्हणतोय?
अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये माझ्या एअरटेल वर फोन करा..
============ ========= ========= ========= ========= ==
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!
============ ========= ========= ========= ========= ==
नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन
No comments:
Post a Comment