Wednesday, May 4, 2011

Jokes for today

एकदा धर्मेन्द्र च्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेन्द्रला जाग येते आणि तो सवयीनुसार ओरडतो
"कुत्ते.... कमीने!"
चोर शांतपणे म्हणतो " ठीक आहे, कमी नेतो".



अजून एक ~

राणी मुखर्जी शाहरुख खानच्या पाठीवर पोळ्या का भाजते?

का? का? का? का?

कारण शाहरुख म्हणतो .... mitawaaaaaaaa (मी तवा)



कदा एक माणूस असं जाहीर करतो की त्याच्या कुत्र्याला छान English येतं. तो तशी पैज
लावतो. बरीच लोकं त्याच्या घरी गोळा होतात. तो हातात एक बिस्कीट घेतो आणि कुत्र्यासमोर
धरुन त्याला म्हणतो "Take Tommy, take."

तर टॉमी जाउन बाजूच्या भिंतीला टेकतो.



पाण्याचा पोपट कसा करायचा?
--> पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही...



नळाचा, पाण्याचा आणि बादलीचा पोपट कसा करायचा?

=> नळ चालू करायचा आणि बादली काढून घ्यायची...

बादलीचा पोपट कसा करायचा?
नळाखाली बादली ठेवायची आणि नळ सुरुच नाही करायचा

No comments:

Post a Comment